Surprise Me!

एका माकडाला पाण्याची बाटली मिळताच टोळी आली, बसमधल्या प्रवाशांनी दाखवली माणुसकी.. | Thirsty Monkeys

2026-05-20 3 Dailymotion

एका माकडाला पाण्याची बाटली मिळताच टोळी आली, बसमधल्या प्रवाशांनी दाखवली माणुसकी.. | Thirsty Monkeys

Thirsty Monkeys Block Bus For Water In Yavatmal Khandala Ghat | Heartwarming Viral Video

सध्या वाढत्या उन्हाळ्याच्या झळा केवळ माणसांनाच नव्हे, तर वन्यप्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत असल्याचे ज्वलंत उदाहरण यवतमाळमधील पुसदच्या खंडाळा घाटात पाहायला मिळाले. वाशिमवरून पुसदकडे येणारी धुळे-यवतमाळ बस खंडाळा घाटात पोहोचताच एक माकड अचानक रस्त्यावर येऊन बससमोर उभे ठाकले. चालक आणि प्रवाशांनी त्या माकडाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते हटण्यास तयार नव्हते. दरम्यान, काही प्रवाशांनी माकडाला तहान लागली असावी, असा अंदाज व्यक्त करत त्याला पाण्याची बाटली दिली. माकडाने पाणी पिण्यास सुरुवात करताच जंगलातील इतर माकडांची टोळीही तेथे जमा झाली. तहानेने व्याकुळ झालेली माकडे पाणी पिण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा करत असल्याचे हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले.
बसमधील प्रवाशांनी आपल्या जवळील पाण्याच्या बाटल्या पुढे करत त्या मुक्या जीवांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार बसमधील प्रवासी लता श्रीवास यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.

#YavatmalNews
#ViralVideo
#HumanityStillExists
#ThirstyMonkey
#KhandalaGhat
#LokmatNews
#WildlifeRescue
#STBusMaharashtra
#MarathiNews
#ActOfKindness
#SummerHeatwave
#BreakingNewsMarathi